8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

मंत्री जाधव यांच्या सत्कारासाठी पोहोचले ‘खाकीधारी!’-सोहळ्याची रंगत वाढली!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लोकप्रतिनिधींचा सत्कार म्हटलं की सर्वच क्षेत्रातील लोक सत्कारासाठी आवर्जून येत असतात. कारण याच लोकप्रतिनिधींशी नंतर समन्वय साधावा लागतो. खासदारकीचा चौकार मारल्याने आणि केंद्रीय मंत्री पद प्राप्त केलेल्या प्रतापराव जाधव यांचा आज जंगी सत्कार सोहळा आहे. या सोहळ्यात सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह खाकीधारी सुद्धा पोहोचलेत. त्यामुळे हा सोहळा अधिकाधिक रंगत चाललेला आहे.

ना.प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, एलसीबीचे प्रभारी ठाणेदार अशोक लांडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देत सत्कार केला. हा सत्कार सोहळा शहरातील धाडणारा परिसरात ओंकार लॉन येथे सुरू असून येथे अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आहे. सध्या मान्यवर आपापले विचार व्यक्त करीत असून टाळ्यांचा गडगडाट सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!