spot_img
spot_img

‘वानखेडे’ यांनी ठेवला ‘सिद्धांत’ बाजूला! – सतीश पवाराच ‘भीम आर्मी आर्मी’च्या जिल्हाध्यक्षपदी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सामाजिक चळवळ उभी करणे येड्या-गबाड्याचे काम नव्हे घरावर तुळशीपत्र ठेवून समाजकारण करणे कठीण असतं! अलीकडे उठ सूट एखाद्या पक्षाचे पद मिळवून समाजकारणाच्या नावाखाली स्वार्थापोटी अर्थकारणाचे काम केले जाते. सांगायचे असे की, सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार यांची भीम आर्मीला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. परंतु या नियुक्तीने भांबावलेल्या आणि पायाखालची जमीन सरकलेल्या सिद्धांत वानखेडे नामक एका व्यक्तीने आपले भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष पद गेल्याने गोंधळ सुरू केला आहे. पवार यांची नियुक्ती रीतसर झालेली आहे. परंतु वानखेडे यांना कोण समजून घेणार? त्यांना सुद्धा विदर्भ प्रदेश कार्यकारणी मध्ये भीम आर्मीच स्थान देण्यात आले आहे.

प्रामाणिक लोकांची संख्या खूप कमी आहे आणि त्यात म्हणजे सतीश पवार यांचे नाव घेणे योग्य राहील.त्यांनी वंचित पक्षात प्रामाणिक व पारदर्शी कार्य करूनही त्यांना आपल्या कामाची पावती वरिष्ठांकडून मिळाली नाही तशी पवारांना कष्टाच्या फळाची अपेक्षा नव्हतीच? परंतु अन्याय झाल्याचे शल्य तेवढे आहे. त्यांच्या या कार्याला पाहून दत्तूजी मेढे,प्रभारी भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र प्रदेश व राजू झनके, अध्यक्ष कोअर कमिटी महाराष्ट्र प्रदेश भीम आर्मी भारत एकता मिशन यांनी बुलढाणा जिल्हा भीम आर्मीमय करण्यासाठी चळवळीत काम करणारे तसेच जिल्ह्यात दबदबा असणारे सतीश रमेश पवार यांची नियुक्ती बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून करण्यास राष्ट्रीय महासचिव म्हणून मान्यता दिली आहे. (महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी तात्पुरती स्थगित असल्यामुळे)
तसेच विद्यमान बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सिद्धांत वानखेडे यांना विदर्भ प्रदेश कार्यकारिणी मध्ये
स्थान देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. परंतु वानखेडे यांनी म्हटले की, भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग, महाराष्ट्र प्रभारी दत्तूजी मेढे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचा आदेश किंवा सूचना येत नाही तोपर्यंत मी जिल्हाध्यक्ष पद सोडण्याचा व कोणताही निर्णय घेणार नाही. मात्र वानखेडे यांना प्रदेश कार्यकारणी मध्ये भीम आर्मीच स्थान देण्यात आले आहे. हे त्यांना कळलेच नसावे किंवा त्यांना जिल्हाध्यक्ष पदच पाहिजे असावे म्हणून ते गोंधळ घालत आहे की काय?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!