बुलढाणा (हॅलो बुलढाणा) 51 तोफांची सलामी.. जेसीबीद्वारे हार आणि फुलांची बरसात.. हे चित्र होते चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या व केंद्रीय मंत्रिमंडळात विराजमान झालेल्या भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांच्या जंगी स्वागताचे!
आज सुरुवातीला त्रिशरण चौकातील प्रतापगड कमानीजवळ ना.जाधव यांचे मोठे उत्सवात स्वागत करण्यात आले. ना. जाधव यांनी पुढे चालत आई जगदंबा यांची आरती करून दर्शन घेतले. दरम्यान कारंजा चौकात भारत मातेच्या पुतळ्याची पूजन करण्यात आले. यावेळी ना.प्रतापरावांना 51 तोफांची सलामी देण्यात आली. दरम्यान परिसर दणाणून गेला होता.
जयस्तंभ चौकात ना. प्रतापराव जाधव यांच्या यांच्यावर जेसीबी द्वारे पुष्प वर्षाव करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील जनतेने चौथ्यांदा खासदारकीचा मान दिल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांची केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदी वर्णी लागली आणि जिल्ह्यात ‘प्रतापपर्व’ सुरू झाले. मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ना. प्रतापराव जाधव यांचा आज रविवार 30 जून रोजी भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. शहरातील धाड नाका परिसरातील ओंकार लॉन येथे गौरव सोहळा आयोजित केला असून अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगत आहे.