spot_img
spot_img

बुलढाण्यात माजी नगराध्यक्षांच्या घरासमोर भयानकच घडलं!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात आज संध्याकाळी आकाश काळवंडले आणि अवघे शहर वादळवाऱ्याने थरथर कापू लागले! जोरदार पावसाबरोबरच विजांचा कडकडाट सुरू असतानाच जनता चौकात मोठा अनर्थ टळला. माजी नगरसेवक तथा नगराध्यक्षपती मोहम्मद सज्जाद यांच्या घरासमोर असलेले जुने झाड अचानक भरवाऱ्यात उन्मळून पडले आणि एका पार्क केलेल्या वाहनावर कोसळले.ही घटना इतकी भीषण होती की काही क्षणासाठी परिसरात एकच घबराट उडाली. सुदैवाने वाहनात कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. झाडाजवळच प्रसिद्ध वकील अ‍ॅड. जावेद यांचे कार्यालयही आहे, त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.

महत्वाची सूचना 

बुलढाणा शहरातील 33 के.व्ही. लाईनवर ब्रेकडाउन झाल्यामुळे वीज पुरवठा रात्री 12 ते 2 दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. कृपया लाईन येईलच अशी खात्री न ठेवता संयम बाळगा.महावितरणचे सर्व कर्मचारी संध्याकाळपासून उपाशीपोटी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

— महावितरण व टीम हॅलो बुलडाणा

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!