spot_img
spot_img

फायरब्रँड नेते रविकांत तुपकरांनी देवीच्या सोंगासमोर धरला ठेका! – डफड्याचा ताल, उधळला गुलाल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील अनेक गावात  नवमीच्या मुहूर्तावर सोंगं काढण्याची परंपरा आहे. यातीलच बुलढाणा तालुक्यातील खुपगाव हेही गाव या परंपरेला अपवाद नाही. खूपगावतहीनवमीच्या मुहूर्तावर रामायण महाभारतातील दशावतारांची रात्रभर डफड्याच्या तालावर सोंगे काढतात.. लोक रात्रभर नाचतात व रामलीला रामायणाचा कार्यक्रम करतात. हुबेहुब रामायणातील पात्रांची वेशभुषा करुन त्याकाळातील परिस्थिती हुबेहूब उभी केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी देवीचे सोंग काढले जाते. प्रत्येक जण देवीच्या सोंगा समोर नतमस्तक होऊन आपली मनोकामना सांगतात व देवीच्या सोंगापुढे नाचतात,या उत्सवात गावातील सर्व माहेरवाशीण मुली, जावई व गावातील संबंधीत सर्व पाहुणे उपस्थित असतात. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी या पारंपारिक उत्साहात उपस्थिती लावली व गावकऱ्यांच्या आग्रहाखातर देवीच्या सोंगासमोर डफड्याच्या तालावर गुलाल उधळत जबरदस्त ठेका धरला!

राज्यभर शेतकऱ्यांसाठी झगडणारा आक्रमक व आश्वासक चेहरा व फायरब्रँड नेता म्हणून ओळख असणारे रविकांत तुपकरांचे अनोखे रुप यनिमित्ताने बघायला मिळाले.
रविकांत तुपकरांचा डफड्याच्या तालावर नाचतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.नवमीच्या दिवशी संध्याकाळी सर्व गावकरी वाजत गाजत देवीच्या मंदिरात जाऊन देवीची पूजा व आरती करतात व ज्याला पुढच्या वर्षी देवीचे सोंग घ्यायचे आहे. त्याच्यासाठी पैशाची हराशी व बोली लावली जाते. जो जास्त देणगी बोलेल त्याला देवीचे सोंग घेण्याचा मान मिळतो.
आलेल्या देणगीतून गावकरी गावातील मंदिरांचा विकास करण्यासाठी या निधीचा वापर करतात. देवीचे सोंग घेतले की मनातील सर्व मनोकमना पुर्ण होतात व आपली सर्व संकटे दूर होतात. अशी यामागील धारणा आहे. प्रत्येक गावातील गावकऱ्यांची आपल्या गाव कुसातील देवीवर प्रचंड श्रद्धा असते. देवीवरील श्रद्धेपोटी गावकरी तीन चार दिवस सर्व कामे सोडून नवमी उत्सवात सहभागी होतात व योगदान देतात. जिल्ह्यातील शेकडो आजही ही परंपरा जिवन्त आहे. रविकांत तुपकर अनेक गावात जाऊन उत्सवात सहभागी होऊन गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित करतात, हे विशेष..!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!