बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्थानिक इंदिरानगर येथे एका युवकाच्या घरात शॉर्टगन रायफल व चोरीच्या मोटार सायकली जप्तीची कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.युसुफ खान आझाद खान 50 रा. इंदिरानगर बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे.त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्या कडून 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
हाती आलेल्या माहितीप्रमाणे, शहर पोलिसांना व बुलढाणा LCB ला गुप्त माहिती मिळाली होती.दरम्यान पोलिसांनी इंदिरानगर येथे सदर आरोपीच्या घरात जाऊन झाडाझडती घेतली असता, आरोपीच्या घरात एक शॉर्ट गन रायफल आढळून आली.तसेच इंजनवरील चेचीस नंबर खोडलेल्या 2 मध्यप्रदेश येथील क्रमांकाच्या पल्सर व बुलेट ह्या दुचाक्या आणि एक स्प्लेंडर अशा 3 दुचाकी आढळून आल्या आहेत.आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून बुलढाणा शहर पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई PSI दत्ता नरवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असून, त्यामध्ये HC दिपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, NPC युवराज राठोड, विजय पैठणे, PC गजानन गोरले, विजेता पवार, मपोका आशा मोरे, दिपाली चव्हाण, पूजा जाधव व चालक पो.का. राहुल बोर्डे यांचा समावेश होता.