spot_img
spot_img

चिखलीत पँथर सेनेचा थैमान; दिपक केदार यांच्या नेतृत्वाखाली मोठा प्रवेश आणि तालुका कार्यकारिणी जाहीर!

चिखली (हॅलो बुलडाणा) ऑल इंडिया पँथर सेनेचा विदर्भात दबदबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दि. 05-06-2025 रोजी चिखली तालुक्यात दिपक केदार यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांचा संघटनेत जोरदार प्रवेश झाला. यावेळी तालुका कार्यकारिणीही मोठ्या उत्साहाने नवनिर्मित करण्यात आली. या ऐतिहासिक प्रसंगी विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले, विदर्भ नेते संकेत जाधव तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी पँथर सेनेच्या जबरदस्त संघटनेवर आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांनी विदर्भातील सामाजिक न्याय आणि लोकशाहीच्या बचावासाठी पँथर सेनेच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष करत संघटनेला अधिक मजबूत करण्याचा निर्धार केला. कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले की, विदर्भात अन्याय, अत्याचार आणि दलित-वंचित समाजाविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध झुंज सुरू राहणार आहे.

चिखली तालुका कार्यकारिणीच्या नवनिर्मितीमध्ये पुढील सदस्यांची निवड झाली – तालुका अध्यक्ष म्हणून अरुण जाधव, उपाध्यक्ष आकाश बोर्डे, महासचिव रमेश अंभोरे, सचिव सागर जाधव, प्रसिद्धी प्रमुख किरण शेजोळ, प्रवक्ता शुभम अंभोरे, आयटी प्रमुख शुभम डोंगरदिवे, शहर अध्यक्ष संदेश डोंगरदिवे, शहर उपाध्यक्ष आशिष ओहाळे आणि शहर संघटक आदित्य जाधव.स्थानिक स्वराज निवडणुकी संदर्भातही या कार्यक्रमात सखोल चर्चा झाली असून, पँथर सेनेने ठाम भूमिका घेत विदर्भात बदल घडवून आणण्याचा निर्धार केला आहे. या प्रवेशामुळे चिखलीत पँथर सेनेचा प्रभाव अधिक बळकट होईल अशी ठाम भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!