बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अति विषारी घोणस जातीचा साप एक तासभर फुत्कारत होता.. आणि महिला व मुलींचा जिव टांगणीला लागला होता.. सुंदरखेड येथील हे भीतीयुक्त चित्र होते.दोन-चार सर्पमित्रांना फोन करूनही ते न पोहल्यामुळे अखेर सर्पमित्र रसाळ यांनी पोहोचून अखेर घोणस बरणीबंद केल्याने घरातील महिला मंडळींनी सुटकेचा श्वास सोडला.
पोलीस कर्मचारी अशोक बोरकर हे सहयोग कॉलनी, सत्यम अपार्टमेंट सुंदरखेड येथे राहतात. ते पोलीस बंदोबस्तासाठी पोहरादेवी इकडे कर्तव्यावर होते दरम्यान त्यांच्या घरी पहाटे 6.30 वाजता फुस्स ss फुस्स असा फुत्कार कानावर पडत होता. हा फुत्कार 3 फुट लांबीच्या घोणस या विषारी सापाचा होता.या सापाला बघून घरातील पाच ते सहा महिलांची व तीन मुलींची भांबेरी उडाली. सकाळची वेळ असल्याने
चार ते पाच सर्पमित्रांना फोन केला असता ते आले नाही मात्र सर्पमित्र श्रीराम रसाळ हे दहा मिनिटात घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हा घोणस शिताफिने बरणीबंद केला.