बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘कर्जमुक्ती’चे आश्वासन ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते,ना.अजित पवार यांनी नाही!’ महायुतीतील तीनही पक्षाची वेगवेगळी भूमिका असते.त्यामुळे कर्जमुक्तीची भूमिका ना. एकनाथ शिंदे यांनी घेतली नाही,ना.पवारांनी घेतली नाही तर ही भूमिका ना.देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची स्पष्टोक्ती आमदार संजय गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये दिली आहे.
निवडणूक पूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली होती.कर्जमुक्तीचे आश्वासन दिल्याने शेतकरी व मतदारांनी महायुतीला प्रचंड बहुमत दिले मात्र निवडून आल्यानंतर ना.अजित पवार म्हणाले की, आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, आपापली कर्ज भरून टाकावी,ही शेतकऱ्यांची फसवणूक नव्हे का? असा प्रश्न एका वृत्तवाहिनीने आमदार संजय गायकवाड यांना केला होता.यावर उत्तर देताना गायकवाड म्हणाले की, कर्जमुक्तीची घोषणा महायुतीने नव्हती केली.ती फक्त ना. देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. महायुतीमध्ये तीन पक्ष काम करतात. प्रत्येक पक्षाची भूमिका वेगवेगळी असते.कर्जमुक्तीची भूमिका ना. एकनाथ शिंदे यांनी घेतली नाही,ना.पवारांनी घेतली नाही तर ही भूमिका ना.देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ‘शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाकावे, असे ना. अजित पवार या वर्षासाठी बोलले आहेत. सरकारकची यावर्षी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची ऐपत नाही, असे गायकवाड म्हणाले.