बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आंबा फळांचा राजा आहे. मात्र या राजावर कृत्रिम अन्याय होत असून,प्रजा देखील कारबाईटने पिकवलेले आंबे चाखत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.परिणामी अन्न औषधी प्रशासन विभागाने जिल्ह्यातील एका गोदामाची तपासणी केली असून, प्रतिबंधित कारबाईटने आंबे पिकवत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल,असा इशारा प्रमोद पाटील,सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग बुलढाणा यांनी दिला आहे.
उन्हाळा लागल्यानंतर सर्वांना आंबे खायची इच्छा असते.बाजारात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे आंबे विक्रीला येतात परंतु काही गोदामात फळ विक्रेता लवकर आंबे बाजारात यावे म्हणून कृत्रिम प्रकारे आंबे पिकवतांना केल्शियम कारबाईट आणि एसिटीलिअन सारखे धोकादायक वस्तूचा वापर करतात. अशाप्रकारे पिकवलेले आंबे हे आरोग्याला धोकादायक असतात म्हणूनच शासनाने या पद्धतीने पिकवले जाणारे आंब्यावर बंदी घातलेली आहे. याउलट शासनाने मान्यता दिलेल्या इथिलिन गॅस,लिक्विड किंवा पावडरचा वापर करून पिकवलेले आंबे विकत घ्यावे. त्या पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा शरीराला कोणता धोका नाही. बुलढाणा जिल्ह्यात आंबे पिकवणाऱ्या गोदामांची तपासणी अन्न विभागाकडून केली जाणार आहे. कोणीही शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीच्या व्यतिरिक्त आंबे पिकवत असेल तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागातील दिला आहे.
▪️सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील काय म्हणाले?
केल्शियम कारबाईट आणि एसिटीलिअन द्वारे आंबे पिकवण्यावर बंदी असून शासनाकडून मान्यता दिलेल्या इथिलिन जी गॅस, लिक्विड किंवा पावडरच्या स्वरूपात असते. यात पिकवलेले आंबे विकत घ्यावे. बुलढाणा शहरातील एका गोदामातून आंब्याचे सॅम्पल घेतले असून तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवलेले आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या गोदामांची तपासणी केली जाणार आहे.