साखरखेर्डा (हॅलो बुलडाणा) महिला सुरक्षित नाहीच, हे वारंवार घडणाऱ्या घटनेंवरून दिसून येत आहे.अशी एक धक्कादायक घटना साखरखेर्डा पोलीस ठाणे अंतर्गत समोर आली आहे. बुलढाण्यातील एका युवतीला कार मध्ये बसवून तोंडावर स्प्रे मारून बळजबरीने तिच्या ओठाचे चुंबन घेऊन छाती दाबल्याचा लज्जास्पद प्रकार हिवरा आश्रम येथे घडला आहे. राजू पांचाळ,सविता पांचाळ,रा.
साईनगर, बुलढाणा अशी आरोपींची नावे आहे. त्यांच्या सोबत इतर 2 अनोळखी मुली सुद्धा आरोपी आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बुलढाण्यातील एका पीडित युवतीचे ब्युटी पार्लर शॉप आहे. 15 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता या युतीला एका ग्राहकाने प्रीवेडिंग शूट करण्यासाठी जायचे आहे म्हणून फोन केला होता.त्यामुळे सदर युवती त्यांच्या सोबत गेली. दरम्यान हिवरा आश्रम येथे युवती कार मध्ये बसलेली असताना, ‘आमची मदत का करत नाही? आमची अट का मान्य करत नाही?’ असे आरोपी राजू पांचाळ,सविता पांचाळ,रा.
साईनगर, बुलढाणा व इतर 2 अनोळखी मुलींनी युवतीला म्हटले. याच वेळी सदर युतीच्या चेहऱ्यावर कसला तरी स्प्रे मारला त्यामुळे युवतीच्या डोळ्याची जळजळ होऊ लागली व तोंडाची आग होऊ लागली.त्यानंतर आरोपी राजू पांचाळ याने युवतीच्या ओठाचे बळजबरीने चुंबन घेतले आणि छाती दाबली. शिवाय ‘कुणाला सांगितले तर तुझ्या कुटुंबाची वाट लावून टाकेल अशी धमकी दिली.सदर पीडित युवतीने 18 मे रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदविल्यामुळे ही तक्रार साखरखेर्डा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करीत आहेत.