बुलढाणा (हॅलो बुलडाणा) लोणार तालुक्यातील वेणी गावात स्मशानभूमीत अतिक्रमण केल्याचा आरोप करून गावकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना न्यायासाठी साकडे घातले. हे अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा कचेरी समोर निदर्शने करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वेणी गावामध्ये दलीत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेमध्ये गावातील व्यक्तीने सरपंच, सचिव यांच्या संगनमताने एक गुंठा जागा आपल्या नावावर करून अतिक्रमण केल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. हे अतिक्रमण काढून बनावट दस्तऐवज रद्द करण्यात यावा या मागणी साठी, वेणी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यासमोर जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आंदोलनात मनीष जाधव, अजय जाधव, जीवन कटारे, रवी जाधव, रवी इंगळे, संतोष इंगळे, रवी वाघमारे, गौतम वाघमारे आदि सहभागी झाले.
▪️काय आहे प्रकरण?
वेणी येथील दलित बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.गावातील गट क्रमांक १९५ मध्ये दलित समाजाची स्मशानभूमी आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये अर्थात ७/१२ मध्ये १ हेक्टर स्मशानभूमीची नोंद आहे. मात्र शाम जाधव यांनी या जागेवरील निळा झेंडा काढून
तेथे अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सरपंच व सचिवांनी ‘अर्थपूर्ण’ उद्देशातून अतिक्रमण
करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. यामुळे अतिक्रमण धारकांची हिंमत व दादागिरी वाढली आहे. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या मी अतिक्रमण काढणार नाही असा दम संबंधित व्यक्त देत आहे. २१ त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जागेची मोजणी करून व सिमा तयार करून स्मशानभूमीची जागा वा दलित समाजास देण्यात यावी.यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा शतप्रश्न निर्माण होणार नाही. ही कारवाई न केल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे या निवेदनावर अजय जाधव, नितीन कटारे, जीवन कटारे, रवि जाधव, रवि इंगळे, संतोष इंगळे, रवि वाघमारे, गौतम वाघमारे आदींच्या स्वाक्षरी आहे.