spot_img
spot_img

मलकापूरात चाललं तरी काय?

मलकापूर (हॅलो बुलढाणा – करन झनके) संवेदनशील असलेल्या मलकापूर शहरात हिंदू व मुस्लिम वस्त्या एकत्रित असणारे अब्दुल हमीद चौक व नवा मोहल्ला या ठिकाणी शुल्लक कारणावरून वाद तंटे उद्भवले अशी सूत्रांकडून माहिती आहे.

वेळीच पोलीस प्रशासन हजर होऊन अटकाव घातल्याने वातावरण शांत झाले.
काही असमाजिक घटकांकडून विनाकारण
शुल्लक कारणांना तीव्रतेने घेऊन समुदायाचा प्रश्न व अस्मितेचा प्रश्न म्हणून वादाचे कारण ठरते. अशा वेळेस पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना कामी या परिसरात बंद पडलेल्या पोलीस चौकी पूर्ववत सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.

▪️ ठाणेदारांना निवेदन
27 जून रोजी शहरातील नागरिकांनी ठाणेदार यांच्याकडे निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, शुल्लक कारणावरून एकाच महिन्यात अब्दुल हमीद चौक व नवा मोहला येथे वाद उपस्थित होऊन हिंदू युवकांवर हल्ला व दगडफेक करण्यात आली. अब्दुल हमीद चौक येथील ऑटो स्टॉप चौकात उभ्या असलेल्या जमावाकडून शाळकरी मुली व महिलांची छेड काढण्यात येणाऱ्या घटना वारंवार घडत आहे. करिता लवकरात लवकर बंद पडलेल्या पोलीस चौकी सुरू करण्यात याव्या तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावून अशा घटनांना अटकाव घालण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!