spot_img
spot_img

केंद्र सरकारने श्रम संहिता रद्द कराव्यात! ..अन्यथा 9 जुलै रोजी देशव्यापी संप पुकारणार! – कॉ.पंजाबराव गायकवाड यांचा इशारा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेले कामगार व जन विरोधी धोरणे सरकारने तातडीने बंद करावे. तसेच कामगारावर अन्याय करणाऱ्या 4 श्रमसंहिता मागे घ्याव्यात अन्यथा 9 जुलै रोजी देशातील 10 प्रमुख कामगार संघटनेच्या वतीने देशव्यापी संप पुकारण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी आज बुलढाणा येथे आयोजित केलेल्या आंदोलनाला संबोधित करताना सरकारला दिला.

देशभरातील 10 प्रमुख कामगार संघटनेच्या वतीने 20 मे रोजी देशव्यापी संपाची हा कामगारांना दिली होती. परंतु देशातील युद्धजन्य परिस्थिती व देशाचे आर्थिक हित लक्षात घेऊन आज रोजी फक्त जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात जिल्हातील सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक, आणि शालेय पोषण आहार कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच तालुका पातळीवर उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, प्रकल्प अधिकारी कार्यालय, आणि आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयावर निदर्शने करून आपल्या मागण्याचे निवेदन तालुका पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.गेल्या 5 महिन्यापासून जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांचा कामाचा हक्काचा मोबदला थकीत आहे.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मोबदला मिळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्रचंड पिळवणूक केली जाते. काही तालुक्यात तर मोबदला काढून देण्यासाठी पैशाची मागणी सूद्धा केली जात आहे.यावर निर्बंध घालण्यात येऊन संबंधितावर फौजदारी गून्हे दाखल करावे अशी मागणी संघटनेच्या वतीने आरोग्य अधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे.अंगणवाडी सेविकांना पदोन्नती साठी अनावश्यक अटी लावून सुपरवाईझर पदा पासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे.तसेच निक्रुष्ठ टी.एच.आर वाटप करण्यासाठी FRS चा वापर करण्याची सक्ती करण्यात येते ती तातडीने बंद करावी.शालेय पोषण आहार कामगारांना जाहीर केलेली एक हजाराची वाढ तातडीने लागू करावी इत्यादी सह सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, सेवेत सामावून घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅज्यूटी आणि पेंशन लागू करा.इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

▪️अधिकाऱ्यांना निवेदन!

बुलढाणा येथे जिजामाता प्रेक्षागार वरील प्रांगणावर सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड, सचिव प्रतिभा वक्टे, शारदा इंगळे, दिपाली एंडोले, विजया ठाकरे ,कविता चव्हाण, शारदा लिंगायत, जयश्री तायडे, वनिता वराडे, शीला जाधव इत्यादी च्या प्रमुख उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, ब तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजनाचे प्रमोद एंडोले त्यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.यावेळी या सहभागी अंगणवाडी कर्मचारी आशा व गटप्रवर्तक, आणि शालेय पोषण आहार या योजना कर्मचाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!