बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गळ्यातून हिसकावून नेलेली सोन्याची दीड तोळ्याची जवळपास 90 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी फिर्यादीच्या सुपूर्द करण्यात आली आहे. ही कामगिरी बुलढाणा शहर पोलिसांनी केली. याप्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
20 फेब्रूवारी रोजी फिर्यादी सुमीत वसंता अंभोरे वय 30 वर्ष, व्यवसाय इंजिनिअर रा. तार कॉलनी, बुलढाणा व त्यांचे आतेभाऊ असे चिखली रोड वरील हॉटेल वरुन जेवण करुन घरी जात असतांना रात्री अंदाजे 11:30 वाजताच्या सुमारास बुलढाणा येथील त्रिशण चौकात 2 अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांचे आत्याभाऊ यांना “तुम्ही आमच्या गाडीला धडक दिली.” असे म्हणुन फिर्यादीचे गळ्यातील दिड तोळे वजनाची सोन्याची अंदाजे 90,000 रुपयांची चैन हिसकावुन त्यांच्या बजाज पल्सर मोटारसायकलने मलकापुर रोडने पोबारा केला होता. याप्रकरणी फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशनला 21 फेब्रुवारी रोजी 181/2025 कलम 309 (4) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, पोलीस स्टेशन बुलढाणा शहरचे ठाणेदार असे पो. स्टॉप सह तात्काळ घटनास्थळी रवाना होवुन बुलढाणा शहर पोलीसांनी गुन्ह्याचा उलगडा केला. तसेच गुन्ह्यातील दोन्ही सोन-साखळी चोरांना निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेवुन चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. गुन्ह्याच्या तपासात हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल दिड तोळे वजनाची सोन्याची चैन 19 मे रोजी मा.न्यायालयाचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक, रवि राठोड व बुलढाणा शहर पो. स्टाफ यांचे उपस्थीतीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांचे हस्ते फिर्यादी सुमीत वसंता अंभोरे यांना सुपूर्त करण्यात आली आहे.