spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – बुलढाण्याचे माजी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची अमरावती पोलिस आयुक्तपदी नियुक्ती! उद्या स्वीकारणार पदभार

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात प्रभावी कामगिरी करणारे माजी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची अमरावती पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पुणे येथे अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) म्हणून कार्यरत असलेले चावरिया यांच्या बदलीचे आदेश नुकतेच राज्य शासनाने जारी केले.गेल्या काही वर्षांत त्यांनी पुण्यात प्रशासनिक स्तरावर महत्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांच्या कार्यकौशल्यामुळेच त्यांच्यावर अमरावतीसारख्या महत्त्वाच्या शहराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उद्या, मंगळवारी (दि. २०) ते अमरावती पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार असून, या नियुक्तीमुळे अमरावतीतील कायदा-सुव्यवस्थेत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे.

अरविंद चावरिया यांच्या कठोर प्रशासन आणि कडक अनुशासनाची छाप बुलढाण्यातील नागरिक आजही विसरू शकलेले नाहीत. आता अमरावतीमध्येही त्यांचा धडाकेबाज कारभार पाहायला मिळणार, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!