बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ग्राहक आयोगाने युलीप अग्रीटेक प्रा. ली. आणि अग्रोस्टार कंपनीला मोठा दणका दिला आहे.तक्रार अर्जदार नामे प्रभाकर भास्कर वराडे, रा. टाकरखेड, ता. नांदुरा यानी त्यांना युलीप अग्रीटेक प्रा. ली. आणि अग्रोस्टार कंपनी द्वारे कमी गुणवत्तेची पपई पिकाची उशिराने रोपे दिल्याने झालेल्या नुकसानीची तक्रार सबंधित कंपनीस दिली होती. कंपनीने सदरच्या शेतकऱ्याच्या नुकसानीच्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि तक्रार देवूनही त्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई न केल्याने तक्रारकर्ता यांनी अॅड. धिरजकुमार प्रकाशचंद गोठी, बुलढाणा यांच्या मार्फत मा. विद्यमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, बुलढाणा येथे तक्रार अर्ज दाखल केला होता.
सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने मा. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली आर. गावंडे आणि सदस्या श्रीमती स्नेहलता पाटील यांनी प्रकरणातील दाखल पुरावे, कागदपत्रे आणि अॅड. धिरजकुमार प्रकाशचंद गोठी यांनी सादर केलेल्या युक्तिवादाचा कायदेशीर रीत्या सकारात्मक विचार करून अर्जदार यांचा अर्ज मंजूर केला आणि सबंधित शेतकरी यास युलीप अग्रीटेक प्रा. ली. आणि अग्रोस्टार कंपनी यांनी रु. 10,08,000 (दहा लाख आठ हजार) दसादशे 6% व्याजदराने नुकसान भरपाई द्यावी आणि अर्जदार यांना झालेल्या शाररीक, मानसिक आणि आर्थिक त्रासाबद्दल रु. 10000/- (दहा हजार) आणि प्रकरणाचा खर्च रु. 7000/- (सात हजार) असा दोन्ही गैरअर्जदार यांनी व्यक्तिगत रित्या किंवा संयुक्त रित्या द्यावा असा आदेश दोन्ही गैरअर्जदार यांच्या विरुद्ध पारीत केला. सदरच्या प्रकरणात अर्जदार यांच्या तर्फे अॅड. धिरजकुमार प्रकाशचंद गोठी, अॅड. जीवन एस. गवई, अॅड. तायडे, अॅड. तौफिक शेख, अॅड. पायल भूतेकर, अॅड रहीम शाह, अॅड राहुल दराखे, अॅड. धिरज वावरे, पवन सरकटे, उमेश गाडेकर यांनी काम पाहिले.