लोणार (हॅलो बुलडाणा/ संदीप मापारी) ‘वाळू चोरीने पूर्णा नदीच्या डोळ्यात पाणी ‘ या मथळ्याखाली ‘हॅलो बुलढाणा’ने आज वृत्त प्रसारीत करताच, लोणार तहसिलदार भूषण पाटील यांनी संध्याकाळी कारवाईचा बडगा उगारत वाळूच्या 4 टिप्परसह 4 आरोपींना ताब्यात घेतले तर 4 जण फरार झाले आहेत. लोणार, मेहकर, रिसोड, मंठा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक होते मात्र या वाळू माफियांवर महसूल विभाग पोटा अंतर्गत कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा – किर्ला , खोरवड- उस्वद- हनवतखेडा , पोखरी केंधळे – भुवन व वझर सरकटे गावांमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरु असून, ही चोरी रोखायची असेल तर टाकळखोपा- किर्ला, देवठाणा व वझर सरकटे या मुख्य केंद्रांमध्ये 24 तासांचे बैठे पथक तैनात करावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली होती. याबबत ‘हॅलो बुलढाणा’ने सडेतोड वृत्त प्रसारीत केले. त्यामुळे महसूल यंत्रणा जागी झाली.दरम्यान
तहसीलदार भूषण पाटील यांनी 17 मे रोजी कारवाईचा बडगा उगारला.तहसीलदार भूषण पाटील, सहकारी मयुर इप्पर,मंडळ लक्ष्मण सानप, ग्राम महसूल अधिकारी सचिन शेवाळे, जगन बारबुदे, राजेश भाकडे, महसूल सेवक प्रकाश मोरे, प्रवीण मापारी व संतोष देशमुख यांनी सापळा रचून 4 टिप्परसह 4 जणांना ताब्यात घेतले आहे.तर 4 जण फरार झाले आहेत.