spot_img
spot_img

23 वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या: चिखलीत खळबळ!

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल)  सैलानी नगर येथे राहणाऱ्या 23 वर्षीय नवाब शाह हारून शाह या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चव्हाण पेट्रोल पंपाजवळ, बुलढाणा रोडवर रात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नवाब शाह याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पोस्टमार्टमसाठी नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरातील लोकांकडून चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, नवाब शाह याच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एक तरुण अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलतो, यामुळे समाजमनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी नवाब शाहच्या मित्रमंडळींसोबतच कुटुंबीयांचीही चौकशी सुरू केली असून, त्याच्या मोबाईलमधील संभाषण व सोशल मीडियावरील हालचालींची तपासणी केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!