बुलढाणा (हॅलो बुलडाणा) समाजातील धोकादाय इसमांना एमपीडीए कारवाई अंतर्गत स्थानबद्ध करण्यात येत असते.अशाच धोकादायक अजय सुखदेव तायडे, वय 25 वर्ष, रा. म्हाडा कॉलनी शेगाव ता. शेगाव जि. बुलढाणा नावाच्या युवकाला एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे आदेशाने पो. स्टे. शेगाव शहर येथील धोकादायक इसम अजय सुखदेव तायडे, वय 25 वर्ष, रा. म्हाडा कॉलनी शेगाव ता. शेगाव जि. बुलढाणा यास स्थानबद्ध करणेकामी MPDA प्रस्ताव तयार करून पुढील आदेशास्तव जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रस्ताव मध्ये जिल्हाधिकारी यांनी दिनांक 13 मे रोजी 1 वर्ष स्थानबद्ध आदेश पारित केला आहे.
सदर युवकाला ताब्यात घेऊन बुलढाणा जिल्हा कारागृह येथे स्थानबद्ध करणेकामी रवाना करण्यात आले आहे. 3 आठवडे नंतर त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे.