spot_img
spot_img

‘समृद्धीच्या जबड्यात’ आणखी 7 जण!ईरटीका व स्विफ्ट कारचा भीषण अपघात 4 जण गंभीर जखमी

जालना (हॅलो बुलडाणा)समृद्धी महामार्गावरील अपघात दुर्दैवीच!समृद्धी वरील अपघाताची मालिका रोखणार कोण? हा यक्ष प्रश्न आहे.काल मध्यरात्री देखील मोठा अपघात झाला. ईरटीका व स्विफ्ट कार मध्ये समोरासमोर धडक होऊन या भीषण अपघातात दोन्ही वाहनातील 7 जण ठार व 4 जण गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात बुलढाणा जिल्ह्याच्या मराठवाडा जवळील सीमेवर कडवंची गावाजळ दूरवर म्हणजे चायनल नंबर 351/ 300 मुंबई कॉरिडोरला झाला आहे. समृद्धी महामार्ग निधोना ते जालना आय सी 14 22.48 वाजता ही घटना घडली.

या अपघाता प्रकरणी हॅलो बुलडाणा टीमने या भयंकर अपघाताची माहिती जाणून घेतली असता, एम एच 12 एम एफ नंबरची स्विफ्ट डिझायर व एम एच 47 बिपी 54 78 ईरटीका यांच्यात समोरासमोर 28 जून च्या मध्यरात्री जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांमधील 3 + 4 प्रवासी प्रमाणे एकूण 7 प्रवासी जागेवरच गतप्राण झाले. याची पृष्टी समृद्धी वैद्यकीय अधिकारी यांनी केली. तसेच ईरटीका कार मधील व स्विफ्ट डिझायर मधील 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ईरटीका मधील फैयाज मंसूरी, फजल शकील मंसूरी, अल्ताफ मंसूरी अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहे. तर स्विफ्ट डिझायर मधील प्रदीप मिसाळ व इतर दोन मृत्यू पावले आहेत. ते पिंपळगाव बुद्रुक तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलडाणा येथील असल्याची माहिती आहे. घटनास्थळी जालना येथील पोलीस निरीक्षक उनवणे व संबंधित पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. अपघातातील वस्तू मोबाईल व पैसे त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!