चिखली (हॅलो बुलडाणा) मनसोक्त दारु पिऊन ॲपे चालकाने निष्काळजीपणे वाहन डिव्हायडरला धडकवल्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना काल चिखली- जालना मार्गावरील हॉटेल नीलम जवळ घडली.प्रकाश बबन झोपाटे (३०) रा.शेलगाव देशमुख तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा असे मृतकाचे नाव आहे.चिखली येथून सायंकाळी आरोपी ॲपे चालक संजय दिलीप गायकवाड रा.नायगाव खुर्द तालुका चिखली जिल्हा बुलढाणा हा आपला एम एच 28 टी 473 क्रमांकाचा ॲपे एका प्रवासीला घेऊन नायगाव खुर्द येथे जात असताना चिखली ते जालना रोडवरील हॉटेल नीलम समोर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ॲपेचालकाचे नियंत्रण सुटले व ॲपे डिव्हायडरला धडकला.झालेल्या अपघातात प्रवासी जागीच ठार झाला आहे.
- Hellobuldana