रायपूर (हॅलो बुलडाणा/ सचिन जयस्वाल) 9 मे 2025: रायपूर गावात आज महाराणा प्रताप जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. बालाप्रसाद जयस्वाल, नितीन दादा राजपूत, रायपूर शिवराणा मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मात्र, नियोजित रॅली आणि पुढील कार्यक्रम जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रद्द करण्यात आले.
याशिवाय, गावातील तरुण डॉक्टर गोपाल पुरुषोत्तम बाहेती यांचे दोन दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. अवघ्या 27 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या डॉ. बाहेती यांचे कुटुंबातील एकमेव अपत्य होते. त्यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावातील वातावरण अत्यंत भावनिक झाले असून, महाराणा प्रताप जयंतीच्या रॅलीचे आयोजन रद्द करण्यात आले.