बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस वाटेल ते काम करतो. परंतु ती व तो
काम करू शकत नाही. कारण वन्यप्राण्यांना हे जमणार थोडेच आहे. भटकंती करीत शिकार करणे हेच त्यांचे एकमेव काम.. मग काय गिरडा परिसरातील पाळीव प्राण्यांचा फडश्या पाडून भूक शमविण्याचा ती म्हणजे बिबट मादी आणि तो म्हणजे बिबट नर यांनी सपाटा लावला. त्यामुळे गावकरी चिंतीत झाले होते. अखेर वन विभागाने पिंजरा लावल्याने दोघेही पिंजऱ्यात कैद झाले.
बुलडाणा तालुक्यातील गिरडा हे गाव अजिंठा पर्वत रांगेवर वसलेले आहे.गावाला लागूनच घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंस्त्र प्राण्यांचे अधिवास आहे. अनेक वेळा बिबट,अस्वल,तडस सारखे वन्यप्राणी गावात देखील दाखल होतात. मागील काही महिन्यापासून परिसरात बिबट्या सतत दिसत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण होते. अशात एका शेतकऱ्याची
गिर जातीच्या गायिला बिबट्यांनी ठार केले
होते. या घटनेनंतर बुलडाणा वन विभागाने गिरडा गावालगतच एक पिंजरा लावला होता. काल रात्री एक मादी बिबट या पिंजऱ्यात अडकली व त्याच्या
अवतीभवती 2 पिल्ले फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ वन
विभागाने दुसरा पिंजरा लावला त्यात ही एक बिबट्याचा बछडा अडकला.या ठिकाणी अजून बिबट असल्याने आता तिसरा पिंजरा सुद्धा लावण्यात आला
आहे.एकाच वेळी 2 पिंजऱ्यात 2 बिबट्या
अडकल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. डीएफओ सरोज गवस यांच्या आदेशाने बुलडाणा आरएफओ अभिजीत ठाकरे यांच्या नेतृत्वात टीमने यासाठी परिश्रम घेतले.