बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी विधानसभा निवडणुक हातातोंडाजवळ आल्याने आपापली शक्तीस्थळे आणि मर्मस्थळे कळल्याने अनेकांना वास्तवाचे भान येऊनही, पक्षाचे तिकीट ‘मलाच भेटणार!’ या अविर्भावात अनेक जण आहेत. त्यापैकी उबाठाचे शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचा तिकीटासाठीचा बालहट्ट पाहता राजकीय वर्तुळात हशा पिकत आहे.
जालिंदर बुधवत साहेब ‘तुम्ही फक्त ठेकेदारी करा.. आमदारकीचे स्वप्न बघू नका..’अशी चर्चा मतदारांमध्ये आणि राजकीय जाणकार करीत आहेत. कारण उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र खेडेकर यांना तिकीट देऊनही ते पराजित झाले. आता विधानसभेतही चूक केली तर बुलढाण्याची विधानसभा ही महाविकास आघाडीच्या हातातून निघून जाईल असेही बोललेल्या जात आहे. असे असले तरीही,
आपल्यालाच उमेदवारी मिळणार, हे गृहीत धरत जालिंदर बुधवत यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीयकृत बँकांना भेटी देत, त्यांना आंदोलनाचा इशारा देणे वगैरे फंडा नागरिकांना चांगलाच लक्षात येऊन राहिला आहे. त्यांनी मतदारांच्या भेटी स्वतः किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेण्यास सुरुवात केली आहे. आपण केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली असून ‘मीच निवडून येणार’ या आविर्भावात ते वावरत आहेत. परंतु त्यांनी केवळ ठेकेदारी करावी, आपल्याकडून जनसेवा होणार नाही, असा सूर सध्या उमटत आहे.