बुलढाणा (हॅलो बुलडाणा) फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात बुलढाणा जिल्ह्याने गौरवास्पद निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली असून बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५. १६ टक्के लागला आहे. बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात द्वितीय क्रमांकावर आहे.
इयत्ता बारावीचा निकाल आज सोमवारी, ५ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याने ९५. १८ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला आहे. वाशीम जिल्हा ९५. ६६ टक्केसह प्रथम ‘ठरला आहे फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी नवीन व पुरवणी परीक्षा देणारे (रिपीटर ) मिळून ३५, ७८४ विध्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५ हजार ५५० विधार्थी परीक्षेला बसले. त्यातील ३३ १८३ विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५. १८ टक्के लागला आहे.उत्तीर्ण मध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची टक्केवारी जास्त आहे. विज्ञान शाखेच्या विध्यर्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त म्हणजे ९८. ८२ आहे. कला शाखा ८८. ५७, ९३, व्यावसायिक (व्होकेशनल) ची टकेवारी ८७.६६ इतकी आहे. दरम्यान तालुकानिहाय निकालात मेहकर तालुक्याने ९८. ४१ टक्के निकालासह जिल्ह्यात बाजी मारली आहे. संग्रामपूर तालुका ९८. ३८ टक्के निकालसह जिल्ह्यात द्वितीय आहे.
▪️एकूण तेरा पैकी इतर तालुक्याचे निकाल पुढीलप्रमाणे…
बुलढाणा ९७. २२ टक्के, मोताळा ९२. ५७, चिखली ९७. ७०, देऊळगाव राजा ९५. ७७, सिंदखेड राजा ९५. ४१, लोणार ९२. ९७, शेगाव९३. २७ टक्के, नांदुरा ९२. ४६, मलकापूर८८. ४३ जळगाव जामोद ९५. ७३ टक्के. मलकापूर वागळता सर्वच तालुक्याची टक्केवारी ९२. ४६ टक्के पेक्षा जास्त आहे.