बुलढाणा (हॅलो बुलडाणा) घरफोडीच्या प्रयत्नातील एक आरोपी पळून जात असतांना त्याची कार झाडाला धडकल्याने तो पोलिसांच्या तावडीत सापडला.शेगाव शहर पोलिसांनी त्याच्याकडून एकुण 9,86,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याने 6 गुन्ह्यांची कबूली दिली आहे. शेख अहेमद शेख समद 36 रा. आरास ले आऊट बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यात कुठे ना कुठे गुन्हेगारी डोके वर काढत असल्याचे भयंकर चित्र आहे.दिवसा गाणी घरफोडी,चोरीचे प्रमाण वाढत आहे.असाच गुन्हेगारीचा प्रकार शेगावात समोर आला मात्र पोलिसांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न उधळून लावला आहे.पोलिस सुत्रा नुसार, 28 एप्रिल रोजी आरोपी शेख अहेमद शेख समद रा. आरास ले आऊट, बुलढाणा व इतर साथीदारांनी फिर्यादी कमलसिंग किरतसिंग परिहार,शेगाव यांच्या घरा समोरील दाराचे कुलुप तोडले होते. तसेच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या देवलाल महादेव ढगे यांच्या घराचे कुलुप तोडून घरफोडीच्या प्रयत्ना दरम्यान आरोपी शेख अहेमद शेख समद हा त्याची MH 48 BH 1205 क्रंमाकाची कार घेऊन पळून जात असतांना कार झाडाला धडकली आणि शेख अहेमद शेख समद पोलीसांच्या हाती लागला व इतर साथीदार फरार झाले आहेत.या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.आरोपीकडून 1 टाटा टिगोर कंपनीची कार, नगदी 15 हजार रुपये, घरफोडीचे औजार असा एकुण 9,86250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने 6 गुन्हयांची कबुली दिली.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोउपनि कुणाल जाधव,पोहेकॉ गणेश वाकेकर, गजानन वाघमारे, संतोष गवई, निलेश गाडगे आदींनी केली आहे.