मलकापूर (हॅलो बुलढाणा) डॉक्टर देवमाणूस समजला जातो. परंतु काही डॉक्टर या देवमाणूसपणाला गालबोट लावणारे ठरतात.मलकापूर शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीने मुलाच्या आयुष्याचे नुकसान झाले आहे. परंतु त्यांच्या चुका झाकण्यासाठी अनेकजण पुढे आलेत हा कळीचा मुद्दा आहे.
याबाबत तक्रार पीडित माता पुनम भारंबे यांनी गेल्या काळात केली होती. या पिढीत मातेच्या तक्रारीवरून तीन सदस्य समिती डॉक्टर चोपडेविरुद्ध गठीत करण्यात आली होती. 26 जून रोजी मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे चौकशी करण्यासाठी समिती आली असता समितीतील सदस्यांची चुकीची वागणूक व चौकशीची चुकीची पद्धत पाहून पीडित मातेने सदर समितीला विरोध दर्शवण्यासाठी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.
याबाबत सविस्तर असे की, डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांच्याविरुद्ध नेमलेल्या तीन सदस्य समितीकडून चौकशीसाठी पीडित माता पुनम भारंबे, पीडित मुलगा दुर्गेश भारंबे व ब्रहानपूर येथील डॉक्टर सुबोध बोरले यासह आरोप केल्या गेलेले डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांना चौकशीसाठी समितीकडून बोलवण्यात आले होते. मात्र डॉक्टर राहुल रमेश चोपडे चौकशी समिती समोर दिसून आले नाही. तरीसुद्धा चौकशी समितीकडून चौकशी सुरू झाली.दरम्यान चौकशी समितीने पीडित मुलगा दुर्गेश याला एका बंद खोलीत नेऊन दार बंद केले. दुर्गेश व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश देण्यास समितीने नकार दिला होता. त्यामुळे पीडित मातेने समितीला विनंती केली की मी मुलाची आई आहे तो आधीच घाबरलेला आहे मला मुलाजवळ येऊ द्या! तरीसुद्धा समितीने काहीही एक ऐकले नाही. त्यामुळे पीडित मातेने संतापून समितीला व समितीच्या चौकशीला विरोध केला. नुसता विरोधच नव्हे तर काळे झेंडे दाखवून समितीचा निषेध पीडित मातेने व्यक्त केला. दरम्यान
बंद खोलीत पीडित दुर्गेश सोबत चर्चा करताना गोपनीयतेच्या नावाखाली काय करण्यात आले हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.