spot_img
spot_img

बुलढाण्यात शिवसेनेच्या ट्रॅक्टर मोर्चाचा माहोल! – महायुतीच्या विरोधात घोषणांचा दणदणाट! -तिनशेहून अधिक ट्रॅक्टरनी वेधले लक्ष!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेतकरी हिताच्या न्यायिक मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज आंदोलनात्मक पवित्र घेत विराट ट्रॅक्टर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.यावेळी महायुतीच्या विरुद्ध प्रचंड नारेबाजी करण्यात आली.शेतकरी हिता च्या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.मान्यवरांच्या भाषणानंतर जिजामाता व्यापार क्रीडा संकुल येथून मोर्चाला सुरुवात झाली.धाड नाका मार्गावरून निघालेला हा ट्रॅक्टर मोर्चा संगम चौक,जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात केली होती परंतु दिलेली आश्वासने हवेतच विरली.कर्जमाफीझाली नाही सातबारा कोरा झाला नाही.विज बिल माफ झाले नाही.पिक विमा शेतीमालाला योग्य भाव सिंचन अनुदान व वन्य प्राण्यापासून संरक्षण यासारख्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत.या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने ट्रॅक्टर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके,आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.दुपारी अडीच वाजता मोर्चाला सुरुवात झाली.तत्पूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. संपूर्ण कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी व्हावी,सोयाबीन, कापूस, मका या सर्व शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा,शेतकऱ्यांना अटीशिवाय पिक विमा मिळावा, तुषार सिंचन व ठिबक सिंचनासाठी रखडलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे, वन्य प्राण्यांपासून शेतमालाचे संरक्षण व्हावे यासाठी तार कंपाऊंड द्यावे,शेतकऱ्यांसाठी वीज माफी करून मोफत वीज द्यावी, पाणीटंचाई आणि इतरही मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!