बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आज सकाळी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहणाच्या पार पडलेल्या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विसर पालकमंत्री मकरंद पाटील यांना पडल्याचे असंवेदनशिल चित्र दिसून आले.
आज एक मे रोजी ध्वजवंदन कार्यक्रम पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.या कार्यक्रमाची नियोजन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाने केले होते.यावेळी पालकमंत्री मकरंद पाटील यांनी शासनाच्या विकासावर एक ते दीड तास भाषण ठोकले मात्र जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झालेल्याप्रति 1 मिनीट मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्याचा त्यांना विसर पडला.एकीकडे देशभर पहलगाम हल्ल्यातील मृतकांविषयी हळहळ व्यक्त होत असताना,पालकमंत्र्यांची ही असंवेदनशीलता पटण्यासारखी नाही.