spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – ठाणेदार संग्राम पाटील ठरले आदर्श पोलीस अधिकारी! पाटील यांना पोलीस महासंचालक पदकाचा बहुमान!

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दलात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे पदक बहाल केले जाते.पाटील यांनी गेल्या 15 वर्षांत पुणे ग्रामीण, बुलढाणा, अकोला, मुंबई आदी भागांत उत्कृष्ट सेवा बजावली असून त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त बुलढाणा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या हस्ते हे पदक प्रदान करणार आहेत.

जिल्ह्यात धाड, धामणगाव बढे, साखरखेर्डा आणि चिखली येथे ठाणेदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी स्थानिक नागरिकांशी उत्कृष्ट समन्वय साधत पोलिसिंगचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या या सन्मानासाठी जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातून तीन जणांची निवड

1.पीआय संग्राम पाटील सर PSO चिखली
2.HC राजु आडवे, TAW Bu
3.HC सुनील जाधव, CRO बुलढाणा

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!