चिखली (हॅलो बुलडाणा) मोकळ्या जागेत झोपणाऱ्या एका जुन्या फर्निचर विक्रेत्याच्या खिशातून तब्बल 25 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने बिचाऱ्या कष्ट उपसणाऱ्या व्यवसायिकाला ही झोप 25000 रुपयात पडली आहे.
चिखली येथील खामगाव चौफुली जवळ मोकळ्या जागेत खामगाव येथील शेख सलीम शेख हनीफ व पंडित गोलांडे हे दोघेजण जूने फर्निचर विक्रीचा व्यवसाय करतात. दिवसभर कष्ट करून त्यांनी दोन-तीन दिवसाची कमाई खिशात घातली आणि रात्र झाल्याने झोपेची तयारी केली. थकले भागले आणि झोपले. परंतु अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशावर डोळा ठेवला होता.रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील पंचवीस हजाराची रक्कम लंपास केली.यावेळी झटापट ही झाली परंतु अंधार असल्याने चोरटे पसार झाले आहेत. परिणामस्वरूप सामान्य जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.