चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) खामगाव रोडवरील शिंदी हराळी फाट्याजवळ सोमवारी रात्री ९ च्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात २९ वर्षीय सोहम अदबाने (रा. अमळापूर) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आई शारदा अदबाने गंभीर जखमी झाली आहे. हे दोघे हिरो एचएफ डिलक्स दुचाकीवरून प्रवास करत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर सोहमच्या डोक्यावरून वाहन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्याची आई शारदा यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर चिखली येथील महिंद्रा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात घडवणारे वाहन घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
- Hellobuldana