spot_img
spot_img

💥मोठी बातमी! भाजप आमदार सुरेश धस एका गुंडाचे ‘आका?’ – कार्यकर्ता ‘खोक्याभाई’वर गुन्हेगारीचा ठपका! – बुलढाणा जिल्ह्यातील पिडीताला दिवाळीआधी उचलून नेले, व्हिडीओ आला समोर!

सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) बीड जिल्ह्यातील शिरूर येथे अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याभाई याने एका व्यक्तीस लाकडी बॅटने निर्दयीपणे मारहाण केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर धस यांच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पीडित व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील माहेरखेड गावातील असून, तो जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करत होता. दिवाळीच्या आधीच त्याला उचलून नेण्यात आले आणि जबरदस्तीने चोरीचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर भोसले आणि त्याच्या साथीदारांनी त्याला अर्धनग्न करून अमानुष अत्याचार केला. ४७ सेकंदाच्या व्हिडीओत भोसले बॅटने मारताना, तर अन्य आरोपी लाथाबुक्क्यांनी तुडवत असल्याचे दिसते.

या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात सतीश भोसलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने माहेरखेड येथे जाऊन पीडिताचे जबाब नोंदवले आहेत.दरम्यान, या घटनेमुळे आमदार सुरेश धस अडचणीत आले असून, तेच एका गुंडाचे आका असल्याची टीका होत आहे. कारण, स्वतः धस यांनीच सतीश भोसले हा त्यांचा कार्यकर्ता असल्याची कबुली दिली होती. त्यामुळे भाजप आमदाराच्या छत्रछायेखाली गुंडगिरी वाढत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आता प्रशासन भोसलेवर कठोर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!