spot_img
spot_img

💥EXCLUSIVE! बुलडाणा जिल्ह्यात १४१ कोटी ६७ लाख विजबिल वसूली थकबाकी! – विज बिल भरले नाही तर वीज पुरवठा होणार खंडित! – मुख्य अभियंता राजेश नाईकसह वरिष्ठ अधिकारी वसूलीसाठी मैदानात!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) वापरलेल्या विजेचे पैसे वेळेवर भरण्यास ग्राहकांकडून टाळाटाळ होत असल्याने महावितरणच्या अकोला परिमंडळातील एकुण थकबाकी २९४ कोटी ४१ लाख रुपयांवर पोहोचली आहे. आर्थीक वर्षाचे शेवटचे २५ दिवस बाकी आहे. त्यामुळे वीजबिल वसुलीसाठी मुख्य अभियंता राजेश नाईकसह सर्व वरिष्ठ अधिकारी फिल्डवर वसुली मोहिमेत सहभागी झाले असून थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि दिलेल्या उद्दिष्टानुसार परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून एकुण २९४ कोटी ४१ लाख रुपयाचे थकीत वीजबिल वसूल होणे गरजेचे आहे; तथापि मागील ५ दिवसांत केवळ १७ कोटी ५१ लाख रुपयेच वीजबिलाचे वसूल झाल्याने उर्वरित २७६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनात परिमंडलात विभाग, उपविभाग, शाखा कार्यालयानुसार वीजबिल वसुली मोहीम तीव्र करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत महावितरण कर्मचारी हा ग्राहकांच्या दारापर्यंत जाऊन वीजबिल भरण्याचे आग्रह धरत आहेत.

▪️ अभियंता मैदानात …

वीजबिल वसुली करणाऱ्या अभियंते व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी मु़ख्य अभियंता राजेश नाईक,अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके,अजय शिंदे आणि अजितपालसिंह दिनोरे यांच्या समवेत त्या-त्या जिल्ह्यात वीजबिल वसुली मोहिमेत सहभागी होत आहे. मोहिमे दरम्यान थकबाकीदार ग्राहक वीजबिल भरण्यास प्रतिसादच देत नसेल तर,त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देशही मुख्य अभियंता यांनी दिले आहे.

▪️परिमंडळात थकबाकी..

परिमंडळा अंतर्गत एकुण थकबाकीत अकोला जिल्ह्यातील १०२ कोटी ५३ लाख, बुलडाणा जिल्हा १४१ कोटी ६७ लाख आणि वाशीम जिल्ह्यातील ५० कोटी २१ ला़खाचा समावेश आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!