बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 10 लक्ष रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
28 फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आमदार धीरज लिंगाडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 120 शाळांना हे साहित्य वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करु, असे आमदार धिरज लिंगाडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपिठावर अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे, कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे, सर्वश्री श्यामभाऊ उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, प्रकाश पाटील, दिलीप जाधव, नरेश शेळके, मगलाताई पाटील, स्वातीताई वाकेकर, प्रा.डॉ. निलेश गावंडे, सतिष मेहेंद्रे, प्राचार्य सुनिल जवंजाळ, डी.डी. वायाळ, शैलेश खेडेकर, रवि पाटील, प्रा. अशोक खोरखेरे, विजय गवारगुरु, टेंबरे, अॅड. विजय सावळे उपस्थित होते. पुढे आ. धिरज लिंगाडे म्हणाले की, गेल्या मागील पाच वर्षामध्ये प्राथमिक, जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न असतील त्या-त्या ठिकाणी बैठका घेवून त्या शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे काम प्रामुख्याने करित आहोत. विधानसभेच्या दोन ते तीन महिने पहिले शासनाने शंभरच्या वर जिआर काढले आहे. त्यामध्ये 20 टक्के 40 टक्के पगारावर काम करीत आहे. त्यांना फक्त टप्पा अनुदान मंजुर करण्याची घोषणा केली. मागील हिवाळी अधिवेषणातही ही पुरवणी मागणी फेटळण्यात आली. शिक्षकांच्या मागण्यांसाठी सतत लढा देत राहणार. आपल्या ज्या काही समस्या असतील त्याचे निवेदनाद्वारे आम्हाला सादर करा, येणा-या अधिवेषामध्ये शिक्षकांच्या मांगण्या मांडणार आहे. मागच्या वर्षी 2023-2024 अमरावती विभागामध्ये 400 शाळांना डिजीटल स्क्रीन दिल्या आहेत. यामध्ये ज्या शाळेची संख्या एक हजार आहे, अशा शाळा पात्र ठरल्या आहे. आपल्याला निधी कमी आणि काम जास्त आहे. त्यामुळे जेव्हढा निधी आपल्याला मिळेल, अधिकाधिक निधी कसा मिळेल याचा सातत्याने प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील आमच्या शिक्षणसंस्था कशा जतन करता येईल असे प्रयत्न करु, असे शिक्षक आमदार धिरज लिंगाडे यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे, श्यामभाऊ उमाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर कम्प्युटर, आरो, प्रिंटर, खुच्र्या, डेक्स बेंच या साहित्यांचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य सुनिल जवंजाळ यांनी तर संचालन प्रा. सुनिल सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाअंती जिल्ह्यातील 120 शाळांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सपकाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक खोरखडे यांनी केले.