spot_img
spot_img

💥 BREAKING! बुलढाण्यात शिवसेनेला हादरा! युवासेना शहर प्रमुख आणि शिवसेना शहर प्रमुखांचा एकाच वेळी राजीनामा! – हेमंत खेडेकर, सचिन परांडेंचा धक्कादायक निर्णय! – पक्षांतर्गत असंतोषाचा उद्रेक!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बुलढाण्यात मोठा धक्का बसला आहे. शहरातील दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी—युवासेना शहर प्रमुख सचिन रमेश परांडे आणि शिवसेना शहर प्रमुख हेमंत अशोकराव खेडेकर—एकाच वेळी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संघटनेतील अंतर्गत घडामोडींमुळे निर्णय?
राजीनाम्याच्या पत्रांमध्ये दोन्ही नेत्यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर निष्ठा असल्याचे नमूद केले आहे. मात्र, 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षासाठी झटूनही संघटनेतील अंतर्गत घडामोडींमुळे राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. या राजीनाम्यांमुळे जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्व अडचणीत आले असून, पक्षात काहीतरी मोठे सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

पक्षांतर्गत नाराजीचा विस्फोट?
बुलढाण्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील नाराजी वाढल्याच्या चर्चा होत्या. आता थेट शहर प्रमुख आणि युवासेना प्रमुखाच्या राजीनाम्यांमुळे त्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. या घडामोडीमुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद कमी होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

पुढील रणनीती काय?
हे दोन्ही माजी पदाधिकारी आता पुढे काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते पक्षातच राहणार की नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणार, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, या राजीनाम्यांवर शिवसेना जिल्हा नेतृत्व काय भूमिका घेणार, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!