spot_img
spot_img

💥EXCLUSIVE या ‘भल्या माणसाचा सत्कार करायचा तर, वही,पेन,पेन्सिल घेऊन या! – बंटी दादा म्हणाले… चिमुकल्यांचा सत्कार म्हणजे माझा सत्कार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा बुलढाण्यात नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी गर्दे सभागृहात संध्याकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडेल. सत्कार करण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी शॉल किंवा पुष्पगुच्छ न आणता गरीब विद्यार्थ्यांना उपयोगी पडावे म्हणून वही, पेन्सिल, पेन इत्यादी साहित्य आणावे असे आवाहन आयोजक ‘आपण सर्व बुलढाणेकर’ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास करतांना हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्तरावर विविध पदे भूषविली. परंतु पदांपेक्षा अधिक त्यांच्या भरीव सामाजिक कार्यामुळेही त्यांना ओळखले जाते. त्यांनी जपलेल्या माणूसपणामुळेच एक भला माणूस…म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. हर्षवर्धन सपकाळ नुकतेच एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. अभिमानास्पद गोष्टींचे सकारात्मक दखल आणि चांगला घडामोडींचे स्वागत हे बुलढाणेकरांची संस्कृती आहे. याच अनुषंगाने हर्षवर्धन सपकाळ या भल्या माणसाचा शनिवारी नागरी सत्कार होत आहे. सत्कार सोहळ्याला सर्व सेवा संघ नई तालीम समितीचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुगन बरंठ, पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुदेव सेवा आश्रम नांदुराचे आचार्य हरिभाऊ वेरुळकर, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर, बुलढाणा एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शाहीनाताई पठाण तथा उमाळ्याचे माजी सरपंच देवराव नाना आदींचा समावेश आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत सोहळ्याचे सूत्रसंचालन करतील.

◾कार्यक्रमापूर्वी निघेल रॅली

सोहळ्याच्या एक तास पूर्वी म्हणजे दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास हुतात्मा स्मारक ते गर्दे हॉल रॅली काढण्यात येणार आहे. हुतात्मा स्मारक येथे अभिवादन झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची रॅली तहसील चौक ते स्टेट बँक चौक, नंतर कोर्ट चौक आणि कारंजा चौक मार्गे कार्यक्रम स्थळी पोहोचेल, याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!