spot_img
spot_img

💥उडविले! वेडा व्यक्ती ठरला अपघाताचा बळी! – सूसाट वाहनांना ब्रेक लागेल कधी?

देऊळघाट (हॅलो बुलडाणा /इमरान खान) दिवसागणिक अपघात वाढताहेत.मात्र सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्यात वाहतूक पोलिसांना यश आले नाही.काल 26 रोजी देऊळघाटला दत्तपुर ला लागून टोल नाक्यावर रात्री 9.30 च्या सुमारास एका वेडसर व्यक्तीला (वय 35 वर्ष) एका अज्ञात वाहनाने उडविल्याने तो जागीच ठार झाला आहे.

देऊळघाट मार्गाने वाहने सुसाट धावतात. अति वेगाने धावणाऱ्या वाहनांना ब्रेक मात्र लागत नाही, ही मोठ्या चिंतेची बाब आहे. एक वेडसर व्यक्ती पायदळ दत्तपुरला लागून टोल नाक्यावरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्याला उडवले. ठार झालेल्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.अपघातची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह ॲम्बुलन्स मध्ये टाकून तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी रेफर करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!