spot_img
spot_img

💥गृहोत्सव! ५५,२८६ जणांची घरकूल स्वप्नपूर्ती होणार! – २८,७७६ आभार त्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातील ५५,२८६ लाभार्थ्यांना घरकूल मंजुरीचे पत्र वाटप आणि त्यापैकी २८,७७६ लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांच्या हस्ते ॲानलाईन वितरित करण्यात आलाय.

केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती संकुल येथे राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना घरकूल मंजुरी पत्र वाटप आणि १० लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा ‘गृहोत्सव’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

तर जिल्ह्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपायुक्त श्री कवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम मोहन, प्रकल्प संचालक राजेश इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य आशिष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत संजय इंगळे यांच्यासह अधिकारी, तसेच पंचायत समिती स्तरावरून स्थानिक आमदार, गटविकास अधिकारी, तसेच सर्व ग्रामपंचायत स्तरावरुन सरपंच, लाभार्थी, नागरिक ॲानलाईनरित्या सहभागी झाले होते. यावेळी या थेट प्रक्षेपण कार्यक्रमात सहभागी झालेल्या घरकूल लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!