चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) मौजे मालगाणी येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवार सकाळी 10 वाजे दरम्यान घडली.दरम्यान अपघाताचे प्रमाण वाढले असून
माहितीनुसार, मृतक मोहम्मद अशपाक अब्दुल रज्जाक हे आपल्या नातवासोबत मालगाणीहून चिखलीकडे येत असताना, चिखली ते बुलढाणा जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत मोहम्मद अशपाक यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा नातू मोहम्मद साद हा किरकोळ जखमी झाला असून, त्याला फक्त खरचटले आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमीला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हलवले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.परंतु वाहतूक पोलिसांनी असे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.














