बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘गुलाबाच्या ओठी आली घेऊन ती गोड चैतन्याची गाणी..जसं पहाटेचं पडलेलं स्वप्न जशी परीची कहाणी!’.. ‘कथा’ यश कायस्थ या चिमुकल्या राजकन्येचा आज पहिला वाढदिवस! तिच्या या वाढदिवसाला सामाजिकतेची किनार लाभलेली.. वाढदिवसाच्या पूर्व दिवशी म्हणजे श्रींच्या प्रगट दिनानिमित्त बुलढाणा येथील मूकबधिर अंधअपंग विद्यालयात चिमुकल्यांना बिस्किट वाटप करण्यात आले.
शहरातील सुखवस्तू कुटुंबात राहणाऱ्यांना वाढदिवस म्हटले की,जंगी पार्टी करावीशी वाटते..पण गरिबांचे काय? मूकबधिर अंध अपंगांचे काय? त्यांचे प्रश्न समजून कोण घेते?हेच सामाजिक भान जपण्याबरोबरच इतरांमध्ये जाणीव निर्माण व्हावी यासाठी कायस्थ परिवाराच्यावतीने शहरातील मूकबधिर अंध अपंग विद्यालयात असलेल्या चिमुकल्यांना बिस्किट वाटपाचा उपक्रम काल राबविण्यात आला.श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा योग आल्याने हा कार्यक्रम अधिकच गोड झाला.’कथा यश कायस्थ’ या राजकन्येचा आज पहिला वाढदिवस असून, तिच्या या वाढदिवसाला सामाजिकतेची जोड लाभल्याने तिला अनेकांचे शुभाशीर्वाद निश्चितच लाभणार आहेत.














