बुलढाणा (हॅलो बुलडाणा) श्रींच्या प्रगट दिनानिमित्ताने का होईना, बुलढाणा जिल्ह्यातील कधी न एकत्र दिसणारे राजकारणी आज महाप्रसाद वाटपासाठी एकत्रित दिसून आले.त्यांच्या चेहऱ्यावरील श्रद्धाभाव अनेकांना यावेळी भावला.त्यामुळे श्रींच्या प्रगटदिनी ‘त्रिदेव!’ प्रकटल्याचे यावेळी बोलल्या जात होते.आमदार संजय गायकवाड यांचे विरोधी म्हणून माजी आमदार विजयराज शिंदे अनेकांना परिचित आहेत.शिवाय शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील गायकवाड यांचे राजकीय विरोधी समजले जातात. हे तिन्ही नेते सहसा एकत्रित दिसून येत नाहीत.परंतु आज येळगाव येथे प्रकट दिनाच्या निमित्ताने आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते पूजन तसेच महाआरती संपन्न झाली.
परमपूज्य ह.भ.प श्री हरी चैतन्यानंदजी महाराज यांचे गायकवाड यांनी मनोभावे दर्शन घेतले!दरम्यान महाप्रसादाला सुरुवात झाली असताना,आमदार संजय गायकवाड यांच्यासोबत माजी आमदार विजयराज शिंदे,शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एकत्रितपणे भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.