बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुंबईच्या ग्रँड रोड वरील सर्वोदय मंडळ कार्यालयात काल सतरंजीवर झोप घेतलेल्या माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची धूरा सांभाळणार आहे..साधी राहणी व उच्च विचार यातून प्रतित होतात.
विधानसभा निवडणुकीत उतरती कळा लागली खरी परंतू नव्याने काँग्रेसमध्ये ‘हर्ष’ फुलविण्यासाठी राज्यातील काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नुकतीच हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. हर्षवर्धन सपकाळ हे मंगळवारी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार आज स्वीकारणार आहे. विद्यार्थी काँग्रेस पासून सुरू झालेला हा प्रवास आमदार आणि आता प्रदेश अध्यक्ष पदापर्यंत पोहोंचतोय. मुंबईत आलं की हे हक्काचं ठिकाण आज ही बदललं नाही. हा साधेपणा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.