बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आता अवैध वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी होणार असून येत्या 7 दिवसात हेल्मेट सक्ती सुद्धा होणार आहे. विशेष म्हणजे ‘हॅलो बुलडाणा’ व शिववाहतूक सेनाने सदर प्रश्न उपस्थित केला होता.दरम्यान यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे.
जिवानिशा कडून मो.वा.च्या 768 केसेस तर 4,50,000 रुपये दंड वसुल करण्यात आला. याप्रकरणी मीटिंग ही घेण्यात आली. दरम्यान जिल्ह्यातील समृध्दी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग व स्थानिक मार्गांवरील अपघातांना प्रतिबंध करणे, वाहतूकीचे योग्य नियमण, संचलन करणे, रस्ते सुरक्षा व वाहतूक नियम या संबंधाने जनजागृती या व इतर बाबींवर सखोल चर्चा करुन रस्त्ये अपघातास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
▪️असे आहेत नियम!
(1) जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांत प्राणांतिक अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून त्यामध्ये प्रामुख्याने
दुचाकी वाहनांचे अपघात होऊन, त्यावरील चालकांचे दु:खद निधन झालेले आहे. अशा प्राणांतिक अपघातांना आळा घालण्यासाठी सर्व दुचाकी चालकांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. सदर हेल्मेट सक्तीची येत्या 07 दिवसांमध्ये संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येईल.
(2) जिल्ह्यातील रस्त्यांवर धावणारे टिप्पर व ईतर वाहने ज्यावर क्रमांक नसल्याचे बऱ्याच अपघात प्रकरणांमध्ये दिसून आले. यास प्रतिबंध बसावा यासाठी बुलढाणा जिल्हा वाहतूक प्राधिकरण (आर.टी.ओ.) व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत संयुक्त मोहिम राबवून, अशा वाहनांवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
( 3 ) बुलढाणा शहरामध्ये रविवार या दिवशी आठवडी बाजार भरतो. सदर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात माल वाहतुक बोलेरो पिकअप वाहने ओव्हरलोड व ओव्हरस्पीडने शहरामध्ये दाखल होतात. अशा वाहनांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा व प्राधिकरण यांना जास्तीत जास्त कठोर कार्यवाहीचे व दंडात्मक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.(4) बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेले राष्ट्रीय महामार्ग, समृध्दी महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा प्रमुख मार्ग व ईतर
ग्रामीण व शहरी भागातील रस्ते यावर ठरवून दिलेल्या वेग मर्यादेप्रमाणे दुचाकी, चारचाकी, मालवाहतुक वाहनांनी ठरवून दिलेल्या मर्यादेनुसारच वाहने चालवावी. ज्यामध्ये प्रामुख्याने शहरामध्ये 40 कि. मी./प्र.ता.
पेक्षा कमी वेगाने वाहन चालवावे. तर ईतर जिल्हा रस्त्यांवर 40 किमी प्रति / तास/ 60 किमी प्रति / तास व समृध्दीवर 120 किमी./प्रति / तास वेगमर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे.
(5) जिल्हा पोलीस वाहतूक विभाग, जिल्हा वाहतूक प्राधिकरण यांनी जिल्ह्यामध्ये वेळ
मोहिम राबवावी. पासणी2/प्राण मध्ये एक (6) जिल्हा आरोग्य विभाग यांचे कडून 108 ही वैद्यकिय अॅम्बुलन्स सेवा अपघ वाचविण्यासाठी राबविण्यात येते. त्या सारखीच बुलढाणा शहरामध्ये रस्त्यांवर हो होणारे जखमी यांचेवर कमीतकमी वेळेमध्ये वैद्यकिय मदत मिळेल यासाठी शास वैद्यकिय पथक जखमींच्यावर उपचारासाठी 24 तास सुसज्ज ठेवावे असे निर्देश दिले.
(7) बुलढाणा नगर परिषद हद्दीमध्ये रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होणारे अतिक्रमण त्याच बरोबर रस्त्यावरुन वाहन चालवितांना दृष्टीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण, बॅनर, पोस्टर असे अतिक्रमण
काढण्यासाठी नगरपरिषद मुख्यअधिकारी यांना निर्देशीत करण्यात आले.
(8) संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये ड्रंक आणि ड्राईव्हची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.यासह विविध नियम असून तसे निर्देश देण्यात आले आहेत.