चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) आज सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास शहरात खामगाव चौफुलीवर भीषण अपघात घडला. जालन्याकडून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने बुलढाणा रोडच्या दिशेने जात असलेल्या सिमेंट मिक्सरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत मिक्सरचा मोठा भाग नुकसानग्रस्त झाला, तर ट्रकदेखील जबरदस्तरीने मोडला.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही, मात्र अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
पोलिसांनी घटनास्थळी त्वरित दाखल होत वाहने ताब्यात घेतली आहेत. सध्या दोन्ही गाड्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आल्या आहेत.