बुलढाणा (हॅलो बुलढाणा)जनसामान्यांच्या अधिकारासाठी, वंचित दुर्बल घटकाच्या प्रगतीसाठी,शासन स्तरावर अंमलबजावणी करणारा प्रथम राजा म्हणून छत्रपती शाहू महाराज आहे. जनसामान्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाहू महाराजांचे अद्वितीय योगदान आहे. महात्मा फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच शाहूंचे विचार कृती प्रवण केले. त्यामुळेच आज शाहू महाराज आणि त्यांचे कार्य अजरामर झाले असे प्रतिपादन ऍड.सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले.
स्थानिक आझाद हिंद महिला संघटना,बहुजन महिला संघटना, आझाद हिंद संघटना,रमाई ब्रिगेड ,किसान ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटना, यांच्या संयुक्त विद्यमानाने शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सायंकाळी चर्चासत्राचे आयोजन संपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करतांना आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. सदर चर्चासत्रात सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई निकम, सुरेखाताई निकाळजे, अलकाताई खांडवे, सिंधुताई अहेर, जोत्सना नागरे, रेणुका जाधव, अँड.सतीशचंद्र रोठे, नारायण भाकडे, सुभाष भागिले, प्रकाश झिने,गुणवंत चव्हाण,राजेंद्र जिने, संतोष हिवरकर, सतीश वक्ते, संजय एंडोले,असलम शहा, योगेश कोकाटे,शेख अफसर, इमरान शाह आदींनी सहभाग नोंदवित चर्चा सत्रात मनोगत व्यक्त केले. संचालन सुरेखाताई निकाळजे तर आभार अलकाताई खांडवे यांनी व्यक्त केले.