spot_img
spot_img

💥क्राईम! तकदीरसिंगचे तकदीर काही काळच चमकले! “चांदीची चमकच त्याला जेलात घेऊन गेली!”

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) लोणार येथील सराफा दुकानातील झालेल्या चोरीची उकल करण्यात लोणार पोलीस व एलसीबी ला यश आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.तकदीरसिंग टिट्टूसिंग टाक 32 रा.गुरुगोविंद नगर तालुका जिल्हा जालना असे या चोरट्याचे नाव आहे. आरोपीने लोणार व रिसोड (वाशिम) येथे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

तकदीरसिंग टिट्टूसिंग टाक या अट्टल चोराने लोणार येथील सराफा दुकानातून 26 किलो 15,30,000 रुपये किमतीची चांदी, 12 हजार रुपये रोख वइतर साहित्य असा एकूण 15,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. सध्या हा मुद्देमाल हस्तगत झालेला नाही.मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.ही कारवाई लोणार पोलीस आणि बुलढाणा एलसीबी चे पथकांकडून करण्यात आली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!