बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पालखी मार्गाची दुरावस्था वारकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते. मात्र फोटोसेशन साठी पालखी खांद्यावर घेणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि संबंधित ठेकेदार याकडे का दुर्लक्ष करतात हा प्रश्नच आहे. सांगायचे कारण असे की,मेहकर विधानसभा मतदारसंघातील शेगाव ते पंढरपुर व लोणार ते देऊळगाव साकर्शा दरम्यानच्या पालखी मार्गाची पार दुरावस्था झाली आहे. दरम्यान या
रस्त्यावरील बाभुळीची काटेरी झुडपे व रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजविण्याची मागणी भाजपाचें तालुकाध्यक्ष सारंग माळेकर यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेहकर मतदारसंघातील शेगाव ते पंढरपुर व लोणार ते दे. साकर्शा दरम्यानच्या रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी बाभूळी ची झुडेपे वाढलेली
असून प्रवासी व इतर लोकांना मोठा त्रास होत आहे.पुढील महिन्यात संत श्री गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचे सुद्धा आगमण होणार आहे. ज्या वारकऱ्या करिता हा पालखी मार्ग करण्यात आला त्यांना
ह्या काटेरी झुडपाचा मोठा त्रास होणार आहे. तसेच पालखी मार्गावर मोठ्या भेगा पडलेल्या आहेत त्या पण बुजवाव्या लागतात. ह्या पालखी मार्गाचे काम पुर्ण केल्या नंतर संबंधित ठेकेदार याने बरीच कामें अर्धवट ठेवली तर आहेतच पण मेंटेनेंस सुद्धा केलेले नाही. संबंधित विभागाचे अधिकारी हे कुंभकर्णी निद्रेत आहे. जर पालखी
येण्याअगोदर हे सर्व काम तत्काळ पुर्ण करण्यात आले नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच मेहकर येथील कार्यालय येथे पालखी मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा देण्यात आला असून निवेदनाच्या प्रती संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.