spot_img
spot_img

अ.भा.मारवाडी संमेलन भरणार.. ‘महिला उद्योजिकांच्या पंखात बळ !’ – कोमलताई झंवर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन! – एकाच छताखाली गृहपोयोगी वस्तू उपलब्ध!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ऑनलाइन शॉपिंगचा धोका लक्षात घेऊन व महिला उद्योजिकांच्या पंखात बळ भरण्यासाठी येथील रेणुका मंगल कार्यालयात अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनात एका छताखाली गृहपयोगी सर्व साहित्य विविध जिल्ह्यातून उपलब्ध करण्यात आले असून येथे लावण्यात आलेल्या स्टॉलला भेट देण्याचे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

सहकार विद्या मंदिराच्या अध्यक्षा कोमलताई झंवर यांच्या हस्ते अखिल भारतीय मारवाडी संमेलनाचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सपना अग्रवाल,वर्षा जैन,डॉ.वसुंधरा गायकवाड,हेमा बोथरा, सरला अग्रवाल, डॉ.छाया महाजन,प्रणिता लाहोटी,कल्पना मुंदडा,राधिका अग्रवाल,अस्मिता अग्रवाल,ममता झवर,मोनिका खंडेलवाल,किरण चिरानिया,शितल मावतवाल,श्रेया डालमिया, किरण वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.अखिल भारतीय महिला मारवाडी संघटनेने पहिल्याच वर्षी हे संमेलन आयोजित केले आहे.या संमेलनात संभाजीनगर, खंडवा,सिल्लोड,खामगाव, जळगाव,भुसावळ अशा अनेक जिल्ह्यातील गृहपयोगी विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत.अलीकडे ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल वाढला असून आपल्याच गावातील व्यवसायिकांचे नुकसान होत आहे.महिला उद्योजिकांच्या पंखांना उभारी मिळावी व यातून महिला सशक्तिकरण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवित असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. दरम्यान कोमल ताई झवर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, महिला व नागरिकांनी रेणुका मंगल कार्यालयातील या संमेलनाला भेट द्यावी असे आवाहन केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!